वांगी लागवड #Agrownet™

by 𝗔𝗴𝗿𝗼𝘄𝗻𝗲𝘁™


Education

free



वांगी लागवड वांगी लागवड करण्यासाठी हलक्‍या जमिनी पासून ते मध्यम काळया पोयटाच्या किंवा भारी जमिनीत वा...

Read more

वांगी लागवड वांगी लागवड करण्यासाठी हलक्‍या जमिनी पासून ते मध्यम काळया पोयटाच्या किंवा भारी जमिनीत वांगे पीक चांगले येते. परंतु उत्तम निचरा असलेल्या काळात जमिनीत किंवा पोयट्याच्या जमिनीत वांगी पीक फार चांगले येते. हलक्‍या जमिनीत हे पीक घ्यायचे असेल तर भरपूर सेंद्रिय खत किंवा हिरवळीची खते वापरून जमिनीचा पोत सुधारणे गरजेचे आहे.या पिकासाठी जमिनीचा सामू 5.5 ते 6.5 असावा.सेंद्रिय पदार्थाचा साठा असलेल्या जमिनीत हे पीक चांगले येते.दलदलीच्या जमिनीत वांग्याचे पीक घेणे टाळावे. हवामान:-वांगी लागवड करण्यासाठी ढगाळ हवामान व एकसारखा पडणारा पाऊस या पिकास अपायकारक आहे कारण अशा हवामानात कीड रोगाचा फारसा उपद्रव होतो. सरासरी 13 ते 21 अंश सें.ग्रे. उष्ण तापमानात हे पीक चांगले येते परंतु उन्हाळी हंगामासाठी योग्य जातींची निवड करावी कारण जास्त उष्णतेमुळे उन्हाळी हंगामात फळांचा रंग फिका होतो त्यामुळे अशा फळांना बाजारभाव कमी मिळतो. वांगी पिकाच्या बिया 25 अंश सें.ग्रे. तापमानात चांगल्या प्रकारे उगवतात. जर तापमान 30 अंश सें.ग्रे.च्या वरती गेले तर परागीभवन आणि फलधारणा याच्या प्रतिकूल परिणाम होतो व उत्पादनात घट येते असे प्रयोगाअंती दिसून आले आहे,या पिकास कोरडे व थंड हवामान चांगले मानवते. लागवडीचा हंगाम:- वांगी लागवड करण्यासाठी वांग्याचे पीक खरीप, रब्बी आणि उन्हाळी अशा तीनही हंगामात घेतले जाते. खरीप हंगामात जर हे पीक घ्यायचे असेल तर रोपवाटिकेत बियाण्याची पेरणी जूनच्या दुसऱ्या आठवड्यात करावी व पुनर्लागवड जुलै महिन्यात करावी. रब्बी हंगामासाठी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात रोपे टाकावीत व नोव्हेंबर महिन्यात रोपे मुख्य शेतावर लावावीत. उन्हाळी हंगामात हे पीक घ्यायचे झाले तर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात रोपे टाकावीत व फेब्रुवारी महिन्यात रोपे मुख्य शेतावर लावावेत. जमिनीची पूर्वतयारी:-वांगी लागवड करण्याआधी पूर्वतयारी करावी त्यात जमिनीची खोल नांगरट करून घ्यावी. जमीन काही काळ तापल्यानंतर कुळवाच्या पाळ्या देऊन ढेकळे फोडून घ्यावीत. त्यानंतर उत्तम कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत हेक्‍टरी 40 ते 45 गाडी घालून जमिनीत मिसळावे. त्यानंतर रोपे लागवडीस तयार होण्याच्या बेताणे योग्य अंतरावर सऱ्या पाडून वाफे तयार करावेत. बियाणांचे प्रमाण:-कमी वाढणाऱ्या जातींसाठी हेक्‍टरी 350 ते 400 ग्रॅम बी पुरेसे आहे. जास्त वाढणार्‍या किंवा संकरित जातीसाठी एकरी 120 ते 150 ग्रॅम बी पुरेसे होते. रोपे अशी तयार करा:-रोपवाटिकेसाठी निवडलेली जमीन मध्यम खोलीची,उत्तम निचरा असलेली तसेच तणांचा प्रादुर्भाव नसलेली जमीन निवडावी. रोपे तयार करण्यासाठी गादी वाफ्याची लांबी 3 मीटर लांब, 2 मीटर रुंद आणि 15 सें.मी उंचीचे वाफे तयार करावेत.प्रति वाफ्यास 2 पाट्या चांगले कुजलेले शेणखत आणि 200 ग्रॅम संयुक्त रासायनिक खत द्यावे. खुरप्याच्या साह्याने खत व मातीचे माती यांचे मिश्रण एकत्र करून गादीवाफ्याला समप्रमाणात पाणी मिळेल अशा अशा पद्धतीने वाफे तयार करावेत. प्रति वाफ्यास मर रोगाच्या नियंत्रणासाठी 30 ते 40 ग्रॅम ब्लायटॉक्स टाकावे वाफ्याच्या रुंदीस समांतर 10 सें.मी अंतरावर बोटाने एक ते दोन सें.मी खोलीच्या ओळी काढून त्यात बी पातळ पेरावे. सुरुवातीस वाफ्यांना झारीने पाणी द्यावे. रोपांच्या जोमदार वाढीसाठी उगवणीनंतर 10 ते 15 दिवसांनी प्रत्येक वाफ्यास 15 ग्रॅम युरिया खत आणि 15 ते 20 ग्रॅम फोरेट रोपांच्या दोन ओळीमध्ये काकरी पाडून द्यावे व हलके पाणी द्यावे. कीड व रोगांच्या नियंत्रणासाठी 10 दिवसांच्या अंतराने एक कीटकनाशक व रोगनाशक मिसळून फवारावे. लागवडीपूर्वी रोपांना थोडा पाण्याचा ताण द्यावा म्हणजे रोप कणखर होईल. लागवड करण्याअगोदर एक दिवस रोपांना पाणी द्यावे. रोप लागवडीस 5 ते 6 आठवड्यात तयार होते. रोपाची लागवड:-मुख्य शेतात रोपांची लागवड करण्यापूर्वी अगोदर सांगितल्याप्रमाणे जमिनीची मशागत करावी. हलक्‍या जमिनीत कमी वाढणाऱ्या जातीसाठी 75 × 75 सें.मी व जास्त वाढणार्‍या किंवा संकरित जातीसाठी 100 × 75 सें.मी अंतर ठेवावे. मध्यम किंवा काळ्या कसदार जमिनीत कमी वाढणाऱ्या जातीसाठी 90 × 75 सेंटिमीटर व जास्त वाढणाऱ्या जातीसाठी 120 × 90 सें.मी अंतर ठेवावे. रोपाची लागवड ढगाळ वातावरणात किंवा रिमझिम पाऊस सुरू असताना केल्यास फायदेशीर ठरते. रोपाची लागवड दुपारी 4 नंतर करावी.